रोटरी क्लब अमळनेरतर्फे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

0

अमळनेर/ आबिद शेख 

अमळनेर : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर तथा जळगाव येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. राजेश पाटील यांचा वाढदिवस रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या विशेष कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी केक कापून डॉ. राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमात श्री. सुनील वाघ यांच्या ‘सुर संगम म्युझिकल ग्रुप’ने विविध सुमधुर गीतांचा नजराणा सादर केला. विशेष म्हणजे डॉ. राजेश पाटील यांनीही आपल्या सुरेल आवाजात गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच सौ. पूर्वा वशिष्ठ यांनीही गीत गायन करून कार्यक्रमात रंगत आणली.

या सोहळ्याला डॉ. राजेश पाटील यांच्या पत्नी तथा प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. सीमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील, सेक्रेटरी रोटे. प्रशांत निकम, माजी नगरसेविका सौ. नूतन महेश पाटील आणि सौ. सोनाली प्रशांत निकम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे रोटरी परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सभासदांसाठी स्नेहभोजन व फेलोशिपचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रोजेक्ट चेअरमन रोटे. प्रीतपाल सिंग बग्गा, रोटे. चेलाराम सेनानी, रोटे. अजय रोडगे आणि सौ. आरती दिनेश रेजा यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची माहिती मकसूद बोहरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed