शाहूनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक विद्युत खांब हलविला; नगरसेविका निलीमा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश..
अमळनेर/आबिद शेख
अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील शाहूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत खांब नागरिकांसाठी मोठा अपघाताचा धोका निर्माण करत होता. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत नगरसेविका सौ. निलीमा रवि पाटील यांनी

सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत हितेंद्र बढे, सहाय्यक अभियंता (MSEB), अमळनेर यांच्या सहकार्याने सदर विद्युत खांब रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला.
रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नगरसेविका निलीमा पाटील यांनी महावितरण विभागाशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही केली.
खांब हलविण्याच्या कामावेळी नगरसेविका रवि पाटील यांच्यासह कपील पाटील, विलास पवार, विजय शिसोदे, कुवर सर, चौधरी सुर, देसले सर, अशोक सोनार, किशोर सैंदाणे, कल्पेश साळुखे, विजय वाणी, कविष पाटील, अमित सोनार, मोहित पवार, सागर विसपुते, बापू सोनार, भरत ठेकेदार, चेतन पवार, भैय्या ठेकेदार, मंगरूळ आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्युत खांब बाजूला हलविल्यामुळे आता रस्त्यावरून वाहतूक सुरळीत होत असून अपघाताचा धोका टळला आहे. नागरिकांनी या तातडीच्या व उपयुक्त कार्यवाहीबद्दल नगरसेविका निलीमा पाटील तसेच महावितरण प्रशासनाचे आभार मानले आहेत.
