मुख्याध्यापक विकास महाजन यांचा माळी पंच मंडळातर्फे सत्कार..
आबिद शेख/अमळनेर
कळमसरे (ता. अमळनेर) : कळमसरे शिक्षण प्रसारक संस्थेच्या शारदा माध्यमिक विद्यालय व एन. एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्यपदी श्री. विकास प्रल्हाद महाजन यांची नुकतीच नियुक्ती झाली. या

नियुक्तीच्या निमित्ताने माळी समाज पंच मंडळ व समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने कळमसरे येथील श्रीराम मंदिरात त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
श्री. विकास महाजन हे शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात असून त्यांचा शैक्षणिक व सामाजिक कार्याचा ठसा गावासह परिसरात उमटलेला आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल समाज बांधवांत समाधान व आनंद व्यक्त करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी मुरलीधर चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, पत्रकार बाबुलाल पाटील, गजानन पाटील, नथु चौधरी, सुकदेव महाजन, नितीन चौधरी, पोलीस पाटील गोपाल महाजन, विजय चौधरी, संजीव महाजन, चुनीलाल महाजन, कैलास महाजन, डॉ. कपिल महाजन, प्रदीप महाजन, दिनेश चौधरी, भालचंद्र चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने माळी समाज बांधव उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक विकास महाजन यांनी समाज बांधवांचे आभार मानले. “समाजाचे माझ्यावर ऋण असून समाजासाठी काहीतरी देणे लागते, ही जाणीव ठेवून भविष्यात त्या ऋणातून उतराई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
