फरांदे पार्क येथे ब्रह्माबाबा अव्यक्त दिन श्रद्धा व उत्साहात साजरा..

24 प्राईम न्यूज 18 Jan 2025
नांदेड : आज रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय फरांदे पार्क येथे पिताश्री ब्रह्मा बाबा अव्यक्त दिन भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्रह्माकुमारीज अनिता दिदी (संचालिका, फरांदे पार्क) होत्या. त्यांनी मुरली वाचनातून ब्रह्माबाबांच्या आध्यात्मिक कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी सुषमा बहन यांनी ब्रह्माबाबांचे “१८ कदम” सविस्तरपणे स्पष्ट केले, तर कुमारी ऋतुजा बहन यांनी ब्रह्माबाबांच्या जीवनप्रवासाची प्रेरणादायी कहाणी मांडली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ब्रह्माकुमारीज राजयोग मेडिटेशन सेंटर, फरांदे पार्क (नांदेड) या मार्गदर्शक फलकांचे उद्घाटन अनिता दिदी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. रामरावजी जाधव भाई, डॉ. आनंदराव मनुरकर भाईजी, उद्योजक राजेंद्र शंकरपुरे भाई, प्रा. निळकंठ जाधव भाई, वाखरडकर स्वामी भाई, पोलीस निरीक्षक मंडलावार भाई, सुधाकर कदम भाई, वटमवार भाई, रुपेश भाई, व्यंकटराव जाधव, डॉ. कल्पना जाधव माताजी तसेच सुषमा बहन, सरोजिनी बहन, शिवलीला बहन, सोनाली बहन, स्वामी माता व ऋतुजा बहन यांची प्रमुख उपस्थिती होती.
फरांदे पार्क व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम शांतता, सकारात्मकता व आत्मिक उन्नतीचा संदेश देणारा ठरला.
