छत्रपती शिवाजी नगरमध्ये आज विराट कुस्त्यांचा ओपन दंगल; कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी..

0
IMG-20260118-WA0000.jpg


अमळनेर | आबिद शेख
जय हिंद व्यायाम शाळा राजे शिवाजी मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी नगर यांच्या वतीने आज रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी अमळनेर शहरात विराट कुस्त्यांचा ओपन दंगल आयोजित करण्यात आला आहे. हा कुस्तीचा थरारक सामना दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार असून, छत्रपती शिवाजी नगर, अमळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन मा नगरसेवक प्रताप शिंपी, जीवन पवार, सुनील पाटील, दीपक चौधरी, पिंटू शिंपी, पैलवान सूरज शिंपी, पैलवान पवन शिंपी यांनी ही कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे


या कुस्ती दंगलीत तालुका, जिल्हा तसेच राज्यातील नामवंत व उदयोन्मुख मल्ल आपली ताकद आणि कौशल्य आजमावणार आहेत. परंपरागत कुस्ती संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असून, कुस्तीप्रेमींसाठी हा एक मोठा मेळावा ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय हिंद व्यायाम शाळा व राजे शिवाजी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली असून, पंच, मैदान व्यवस्था, सुरक्षितता तसेच प्रेक्षकांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. विजयी मल्लांसाठी बक्षिसे व सन्मानचिन्हे देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या कुस्ती दंगलीला अमळनेर व परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मल्लांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. परंपरा, शौर्य आणि क्रीडासंस्कृतीचे दर्शन घडवणारा हा विराट कुस्त्यांचा ओपन दंगल निश्चितच शहराच्या क्रीडा इतिहासात एक लक्षवेधी कार्यक्रम ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed