अमळनेरमध्ये हृदयरोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 102 नागरिकांची तपासणी, 14 रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी..

0
New-Doc-01-16-2026-20.26.jpg


अमळनेर | आबिद शेख
अमळनेर शहरात लायन्स क्लब अमळनेर, नर्मदा मेडिकल फाउंडेशन अमळनेर आणि एसएमबीटी हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने

आयोजित करण्यात आलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शुक्रवार, दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी अस्मी सीटी स्कॅन व डायग्नोस्टिक सेंटर परिसरात हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
या शिबिरात लहान मुलांसाठी (0 ते 18 वर्षे) मोफत हृदयरोग तपासणी व 2D इको सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच प्रौढ नागरिकांसाठी केवळ 50 रुपयांत नाव नोंदणी, तर ईसीजी, रक्तातील साखर व रक्तदाब (बीपी) तपासणी पूर्णतः मोफत करण्यात आली. याशिवाय, 2D इको तपासणी अत्यल्प दरात म्हणजेच 500 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली होती.
सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हृदयरोग तज्ज्ञांच्या उपस्थितीत तपासणी प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 102 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
तपासणीदरम्यान 14 रुग्णांना गंभीर स्वरूपाच्या हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले. या रुग्णांना 26 जानेवारी रोजी नाशिक येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये विनामूल्य नेण्यात येणार असून, त्यांच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्चही मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ही बाब गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरली आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. ऋषिकेश तामसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक सूर्यकांत पाटील, नितीन कोळी, प्राची सोनवणे व दिपीका साबळे यांनी सेवाभावाने उत्कृष्ट कार्य केले.
यावेळी लायन्स क्लब अमळनेरचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, प्रोजेक्ट चेअरमन मनीष जोशी, तसेच प्रदीप जैन, सुनील चौधरी, एस. डी. भरुचा, रवींद्र कॉलरा, डॉ. मिलिंद नवसारीकर, पंकज मुंदडा, डॉ. रवींद्र जैन, प्रकाश शहा, चंद्रकांत महाजन, शेखर धनगर यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.
लायन्स क्लब अमळनेर आणि नर्मदा मेडिकल फाउंडेशन यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे हृदयरोगाबाबत जनजागृती, लवकर निदान आणि योग्य उपचाराची दिशा मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले असून, भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed