अमळनेरमधून ८ कुस्तीगीरांची राज्यस्तरीय निवड; महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी दमदार कामगिरी..
अमळनेर | आबिद शेख
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा पेंडगाव (ता. भडगाव) येथे पार पडल्या. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील कुस्तीगीरांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ८ कुस्तीगीरांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, अमळनेरसाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.

ग्रीक रोमन प्रकारात २० वर्षांखालील गटात
प्रतीक पाटील – ६० किलो
मुकेश बावीसकर – ६५ किलो
तर वरिष्ठ गटात
भावेश कोळी – ६० किलो
संदीप पाटील – ७२ किलो
यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
महाराष्ट्र केसरी गटात
योगराज चौधरी – ६५ किलो (उपविजेता)
हर्ष प्रताप शिंपी – ७९ किलो (उपविजेता)
यांनी उपविजेतेपद पटकावले, तर
निजाम हसन अली सैय्यद – ९२ किलो
यांनी विजेतेपद मिळवत थेट राज्यस्तरीय निवड निश्चित केली.
अमळनेरमधून खूप वर्षांनंतर एकाच वेळी ८ कुस्तीगीरांची राज्यस्तरीय निवड झाल्याने कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तरुण मुला-मुलींना मिळालेल्या क्रीडा संकुलातील सुविधांचा आणि रोजच्या सरावाचा मोठा फायदा होत असून, याच मेहनतीचे हे यश असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या सर्व कुस्तीगीरांचे तालुका कुस्तीगीर संघातर्फे अभिनंदन करण्यात आले. तसेच मा. मंत्री आ. अनिल भाईदास पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंगळ ग्रहचे मा. श्री राजू महाले, मार्केट सभापती श्री अशोक आधार पाटील, पत्रकार संघटना यांच्याकडूनही अभिनंदन करण्यात आले.
कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी श्री बाळू संतोष पाटील, संजय कौतिक पाटील, प्रताप अशोक शिंपी, संजय भिला पाटील, शब्बीर पैलवान, रावसाहेब पैलवान, भरत पवार, हसन पैलवान, प्रविण पाटील यांनीही सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अमळनेरमधील कुस्तीप्रेमींनी या यशाचे सर्वत्र कौतुक केले आहे.
या यशाचे श्रेय मा. अनिल दादा पाटील यांनी क्रीडा संकुलात उभारून दिलेल्या भव्य हॉलला तसेच तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला देण्यात येत आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत अमळनेरचे कुस्तीगीर नक्कीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
