मुस्लीम व खाटीक कब्रस्ताना समोर सुरू असलेला पत्त्याचा क्लब तात्काळ बंद करा; अतिक्रमण हटवण्यासाठी निवेदन..

0
New-Doc-01-15-2026-22.09.jpg


अमळनेर | आबिद शेख
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात असलेल्या मुस्लीम कब्रस्तान व खाटीक कब्रस्तानासमोर नगर परिषदेच्या जागेवर बेकायदेशीररीत्या सुरू

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
🎁 101 बक्षीसे वाट बघत आहे !
लकी कूपन योजने चे शेवटचे काही दिवस शिल्लक…!!
योजना कालावधी
25 जानेवारी 2026 पर्यंत
916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% *

असलेला पत्त्याचा क्लब तात्काळ बंद करण्यात यावा, तसेच सदर ठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात अमळनेर येथील रफिक शेख रशिद यांनी मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर पत्त्याचा क्लब नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण करून सुरू असून तो थेट कब्रस्तानाच्या समोर चालविला जात आहे.
क्लबमध्ये पत्ते खेळणारे अनेक जण दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात. तसेच कब्रस्तानासमोर लघवी करणे, आरडाओरडा करणे अशा प्रकारांमुळे परिसरातील धार्मिक पवित्रतेचा आणि शांततेचा भंग होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
कब्रस्तान हे श्रद्धेचे व शांततेचे स्थान असून, अशा ठिकाणी जुगार व मद्यपानासारख्या गैरप्रकारांना मोकळे रान देणे अत्यंत निंदनीय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
जर सदर पत्त्याचा क्लब तात्काळ बंद करण्यात आला नाही व अतिक्रमण हटविले गेले नाही, तर परिसरातील नागरिक उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या प्रकरणी नगर परिषद प्रशासनाने व पोलीस विभागाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed