अमळनेर–सोनगीर रस्त्यावर बस अपघात; ट्रॅक्टर ओव्हरटेक करताना बस उलटली, १५ प्रवासी बालंबाल बचावले..

0
New-Doc-01-15-2026-09.56.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर येथून सोनगीरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरवाडे गावाच्या पुढील भागात बुधवार, दि. १४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
🎁 101 बक्षीसे वाट बघत आहे !
लकी कूपन योजने चे शेवटचे काही दिवस शिल्लक…!!
योजना कालावधी
25 जानेवारी 2026 पर्यंत
916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% *

अमळनेरहून सोनगीरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस (क्र. एमएच १४–२३४७) अपघातग्रस्त झाली. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. ही घटना प्रत्यक्षदर्शींनी सांगितली.
सदर बसमधून अंदाजे १५ प्रवासी प्रवास करीत होते. अपघाताची तीव्रता मोठी असतानाही सुदैवाने कोणालाही गंभीर किंवा किरकोळ दुखापत झाली नाही. मकर संक्रांतीसारख्या सणाच्या दिवशी मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अपघाताची माहिती मिळताच अमळनेर बसस्थानकाचे आगार प्रमुख पी. बी. चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रवाशांची सुरक्षितता आणि आवश्यक मदतीची व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान, या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघाताची शक्यता कायम असल्याचे नागरिकांकडून बोलले जात असून, प्रशासनाने वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed