शाळेत मुलीला सोडायला जाताना मांजाने गळा कापला; वेळीच उपचार मिळाल्याने वडिलांचे प्राण वाचले..
अमळनेर | आबिद शेख
दि. १४ जानेवारी रोजी सकाळी तांबेपुरा भागातील नंदगाव रोडवर एक धक्कादायक घटना घडली. आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघालेले महेश भीमराव पाटील (वय ४६, रा. रंजाणे) यांच्या गळ्याला अचानक पतंगाच्या मांजाने कापले. विशेष म्हणजे सुरुवातीला त्यांना याची कोणतीही जाणीव झाली नाही.

🎁 101 बक्षीसे वाट बघत आहे !
लकी कूपन योजने चे शेवटचे काही दिवस शिल्लक…!!
योजना कालावधी
25 जानेवारी 2026 पर्यंत
916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% *
दरम्यान, मुलीनेच वडिलांच्या गळ्यातून रक्त येत असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर प्रसंगाचे गांभीर्य समोर आले. याच वेळी घटनास्थळी साफसफाईसाठी उपस्थित असलेले नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक संतोष माणिक यांनी तत्काळ परिस्थिती ओळखून नगरसेवक मुक्तार खाटीक यांना बोलावले.
तात्पुरता रुमाल बांधून पाटील यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. आशिष पाटील यांनी प्राथमिक उपचार करून जखम गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवले. पुढील उपचार डॉ. संदीप जोशी यांनी केले. गळ्यावरील जखम खोल होती, मात्र वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, श्वासनलिका कापली गेली असती तर घटनास्थळीच मृत्यू झाला असता, अशी धक्कादायक शक्यता होती.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून,
पतंग उडवणाऱ्या मुलांवर पालकांनी नियंत्रण ठेवावे, तसेच
सायकल व दुचाकीस्वारांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी
झामी चौक, शाह आलम नगर, शिवशक्ती चौक, दादावाडी आदी भागात कारवाई करत
मुलांकडून तसेच एका दुकानदाराकडून मांजाची बंडले जप्त केली आहेत.
