अमळनेर नगर परिषदेकडून प्लास्टिक बंदी व नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाई; २०२ किलो साहित्य जप्त, १५ हजारांचा दंड..
अमळनेर | आबिद शेख
अमळनेर नगर परिषद स्वच्छता विभागामार्फत शहरात प्लास्टिक बंदी व नायलॉन मांजाविरोधात आज मंगळवार, दि. १४ जानेवारी २०२६ रोजी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी करून नायलॉन मांजा व प्लास्टिक विक्री करणारे

🎁 101 बक्षीसे वाट बघत आहे !
लकी कूपन योजने चे शेवटचे काही दिवस शिल्लक…!!
योजना कालावधी
25 जानेवारी 2026 पर्यंत
916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% *
दुकानदार तसेच नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्या नागरिकांकडून साहित्य जप्त करण्यात आले.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक, संतोष जाधव, किरण खंडारे, मुकादम स्वप्नील बिऱ्हाडे, मुकादम गौतम मोरे, शहर समन्वयक गणेश गढरी यांच्यासह श्याम करंदीकर, अनंत संदानशिव, योगेश पवार, महेंद्र बिऱ्हाडे, भरत आगळे, प्रवीण बिऱ्हाडे, कुंदन सोनावणे, सतीश बिऱ्हाडे, युनूस शेख आदी कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान एकूण २०२ किलो प्लास्टिक व नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. शहरातील प्लास्टिक विक्रेते १) बाबा प्लास्टिक, २) संजय प्लास्टिक, ३) कोमल भोजनालय यांच्यावर एकूण १५,००० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरात स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून, नागरिकांनी प्लास्टिक बंदी असलेले प्लास्टिक व नायलॉन मांजाचा वापर टाळावा तसेच कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असेही मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांनी यावेळी सांगितले.
