संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा दिलासा. आचारसंहितेतून वाट मोकळी; नियमित हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात..

0
New-Doc-01-14-2026-09.48.jpg

24 प्राईम न्यूज 14 Jan 2025
राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मकरसंक्रांतीपूर्वी मोठा दिलासा मिळाला असून, डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा नियमित हप्ता मंगळवारपासून त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागला आहे. सकाळपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक मेसेज येऊ लागल्याने योजनेचा लाभ प्रत्यक्षात सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

🎁 101 बक्षीसे वाट बघत आहे !
लकी कूपन योजने चे शेवटचे काही दिवस शिल्लक…!!
योजना कालावधी
25 जानेवारी 2026 पर्यंत
916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% *


राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. अशा परिस्थितीत कोणतेही नवीन लाभ, नवीन योजना किंवा मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा करण्यास मनाई असते. मात्र, आधीपासून सुरू असलेल्या आणि नियमित स्वरूपातील योजनांचा लाभ देण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, मकरसंक्रांतीनिमित्त डिसेंबर व जानेवारी महिन्याचे मिळून एकरकमी ३ हजार रुपये मिळणार असल्याच्या बातम्या व सोशल मीडियावरील पोस्टमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या दाव्यांबाबत विविध तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या होत्या. काही राजकीय पक्षांनी हा प्रकार आचारसंहितेचा भंग ठरतो का, असा सवाल उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांकडून वस्तुस्थितीचा अहवाल मागवला. त्यानुसार, आयोगाने स्पष्ट केले की, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू झालेल्या योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवता येतात. मात्र, त्या योजनांचा लाभ अग्रिम स्वरूपात देणे, नवीन लाभार्थी निवडणे किंवा लाभाच्या रकमेतील बदल करणे हे आचारसंहितेच्या विरोधात ठरते.
याच भूमिकेनुसार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता आगाऊ देण्यास आयोगाने नकार दिला, तर डिसेंबर महिन्याचा नियमित १५०० रुपयांचा हप्ता देण्यास मात्र परवानगी दिली. त्यामुळे आजपासून हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये जमा होऊ लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed