डबल धमाका ऑफर्समुळे रवि ज्वेलर्स मध्ये ग्राहकांची तुफान गर्दी. आकर्षक सवलतींमुळे विक्रीत लक्षणीय वाढ; ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद..
अमळनेर | आबिद शेख
शहरातील नामांकित व विश्वासार्ह रवि ज्वेलर्स येथे सुरू असलेल्या डबल धमाका ऑफर्समुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. लग्नसराई व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या–चांदीच्या दागिन्यांवर मिळणाऱ्या आकर्षक सवलतींमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

लकी कूपन योजने चे शेवटचे काही दिवस शिल्लक…!!
योजना कालावधी
25 जानेवारी 2026 पर्यंत
916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% *
916 हॉलमार्क दागिन्यांवर मजुरी फक्त 5% पासून तसेच प्रत्येक ₹10,000/- च्या दागिने खरेदीवर लकी कूपन योजना सुरू असल्याने ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या खास ऑफर्समुळे रवि ज्वेलर्स ने ग्राहकांना मोठा दिलासा दिला असून विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
दुकानात डिझायनर दागिने, पारंपरिक दागिने तसेच हलके-फुलके आधुनिक दागिने मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध असून ग्राहक आपल्या आवडीनुसार कस्टमाइज्ड डिझाइनची सुविधा देखील घेत आहेत. गुणवत्तेची खात्री देण्यासाठी कॅरेटोमीटर तपासणी व HUID 916 हॉलमार्क असलेले दागिने उपलब्ध असल्याने ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
चांदीच्या दागिन्यांमध्ये पायल, फॅन्सी जोडवे, शुद्ध चांदीची भांडी, भरीव देवांच्या मूर्ती तसेच विशेष डिझाइन उपलब्ध आहेत. तसेच 925 स्टर्लिंग सिल्व्हरमध्ये लेडीज व जेंट्स अंगठ्या, कडे, ब्रासलेट, कानातले, जी.बी. स्टोन बाळी, विविध देवांचे पेंडल यांची मोठी रेंज ग्राहकांना आकर्षित करत आहे.
गुंतवणुकीसाठी 24 कॅरेट 99.50% शुद्धतेची सोन्याची नाणी व बिस्किटे 1 ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंत, तसेच 999 शुद्ध चांदी 5 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय किसना रियल डायमंड ज्वेलरी देखील उपलब्ध असून त्यावर 95% एक्सचेंज व्हॅल्यू व 90% पर्यंत बायबॅक व्हॅल्यू दिली जात आहे.
महिला ग्राहकांची संख्या विशेषतः जास्त असून ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहक रवि ज्वेलर्स मध्ये खरेदीसाठी येत आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी दुकानात योग्य ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय रवि ज्वेलर्स तर्फे सुरू करण्यात आलेली “सुवर्ण महाबचत योजना” ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. “थेंबे थेंबे तळे साचे, सोन्याचे…” या उक्तीप्रमाणे या योजनेत दरमहा ₹2,000/- पासून बचत करता येते. 11 महिने रक्कम भरल्यानंतर 12व्या महिन्याचा हप्ता बोनस स्वरूपात रवि ज्वेलर्स कडून दिला जातो. तसेच मोफत ज्वेलरी इन्शुरन्सची सुविधा देखील देण्यात येत आहे.
या सर्व ऑफर्समुळे विक्रीत मोठी वाढ झाल्याची माहिती रवि ज्वेलर्सचे संस्थापक विजय वर्मा, संचालक रवि वर्मा व निखिल वर्मा यांनी दिली. सर्व ग्राहकांनी या मर्यादित कालावधीसाठी असलेल्या डबल धमाका ऑफर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सणासुदीच्या खरेदीसाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले असून रवि ज्वेलर्स पुन्हा एकदा शहरातील विश्वासार्ह ज्वेलर्स म्हणून पुढे आले आहेत.
