चाळीसगाव संघाला नमवून जळगाव संघाचा दणदणीत विजय; खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ क्रिकेट चषक २०२६ जळगावकडे..
अमळनेर | आबिद शेख
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने जळगाव

लकी कूपन योजने चे शेवटचे काही दिवस शिल्लक…!!
योजना कालावधी
25 जानेवारी 2026 पर्यंत
916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% *
जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेली “महासंघ क्रिकेट चषक स्पर्धा २०२६” अमळनेर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर दि. १० व ११ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चाळीसगाव संघाला नमवून जळगाव संघाने महासंघ क्रिकेट चषक २०२६ पटकावला. अंतिम सामना चुरशीचा ठरला. जळगाव संघाच्या रोहित बोरसे यांनी उत्कृष्ट खेळी करत “मॅन ऑफ द मॅच” पुरस्कार पटकावला.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये —
▪️ मालिकावीर : मोईज शेख (चाळीसगाव)
▪️ उत्कृष्ट गोलंदाज : रोहित बोरसे (जळगाव)
▪️ उत्कृष्ट फलंदाज : अंकित पाटील (अमळनेर ‘ब’)
महासंघ क्रिकेट चषक स्पर्धेत अमळनेर अ, अमळनेर ब, पारोळा, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, भुसावळ, यावल आणि जामनेर-बोदवड अशा एकूण दहा संघांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन अमळनेरचे आमदार मा. अनिलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विजेत्या संघाला व उत्कृष्ट खेळाडूंना हेमाकांत पाटील तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेला लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, बाजार समिती सभापती अशोक पाटील यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी हेमंतकुमार पाटील, शरद पाटील, मनोहर पाटील, नितीन लाड, नाना पाटील यांनी उपस्थिती लावून खेळाडूंचा उत्साह वाढवला.
तसेच शिक्षक महासंघाचे अतुल चौधरी, गणेश लोळते, स्वप्नील पाटील, आशिष चौधरी, महेंद्र रामोशे यांच्यासह अमळनेर शहरातील खाजगी प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडली.
दरम्यान, स्पर्धेचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या केल्याबद्दल अमळनेर तालुका खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य पदाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे.
अमळनेर येथे संघभावना, खिलाडूवृत्ती व उत्साहाने भारलेल्या वातावरणात महासंघ क्रिकेट चषक स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाली असून, यानिमित्ताने संपूर्ण परिसर महासंघमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
