धनादेश अनादर प्रकरणी अमळनेर न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल; आरोपीची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता..

0
New-Doc-01-12-2026-07.49.jpg


अमळनेर /आबिद शेख
येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सन २०१३ पासून प्रलंबित असलेल्या धनादेश अनादर (Cheque Bounce) प्रकरणाचा नुकताच निकाल लागला असून, न्यायालयाने आरोपी सुधाकर कोळी यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे तब्बल १२ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला पूर्णविराम मिळाला आहे.
अमळनेर येथील आशापुरी नागरी पतसंस्थेने आरोपी सुधाकर कोळी यांच्या विरोधात भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा (NI Act) कलम १३८ अंतर्गत खाजगी फिर्याद दाखल केली होती. आरोपीकडून २ लाख ५६ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला असून तो अनादरित झाल्याचा आरोप फिर्यादी पतसंस्थेने केला होता. सदर प्रकरण (फौजदारी खटला क्र. ४५६/२०१३) सन २०१३ पासून न्यायालयात सुरू होते.
न्यायालयाचा निकाल:
या प्रदीर्घ चाललेल्या खटल्यात आरोपीच्या वतीने अॅड. नंदलाल सूर्यवंशी यांनी भक्कम आणि प्रभावी युक्तिवाद मांडला. फिर्यादी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत, कायदेशीर बाबींचे सखोल विवेचन करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर पुरावे तपासून मे. न्यायालयाने आरोपी सुधाकर कोळी यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.
या यशस्वी निकालासाठी अॅड. नंदलाल सूर्यवंशी यांना त्यांचे काका श्री. मुंडके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच अॅड. व्ही. एन. चौधरी व अॅड. संभाजी पाटील यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले. या निकालामुळे कायदेशीर क्षेत्रातून अॅड. सूर्यवंशी यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed