चाळीसगाव येथे भव्य मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वितरण शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

चाळीसगाव/प्रतिनिधी
चाळीसगाव : कादरीया एज्युकेशन अॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल, चाळीसगाव यांच्या मैदानावर दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आला हजरत फाउंडेशन यांच्या वतीने भव्य मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शहरासह परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असून शेकडो रुग्णांनी आरोग्य तपासणी करून मोफत औषधांचा लाभ घेतला.
शिबिरामागील सामाजिक व आरोग्यविषयक उद्देश शकील सुबहानी सर यांनी प्रभावीपणे मांडला. या उपक्रमात शहरातील व परिसरातील नामवंत डॉक्टरांनी आपली नि:स्वार्थ सेवा दिली.
यामध्ये डॉ. हमीद इकबाल (MBBS, DCH), डॉ. मुबश्शीर जमील (MBBS, DCH), डॉ. वसीम अहमद (MBBS, MS ऑर्थो), डॉ. अजहर अंजुम (MBBS), डॉ. हसनुर्रहमान (MBBS, DCH), डॉ. शादाब खान (MD, Medicine – ISM), डॉ. शेख फहीम अहमद (BAMS, DYA), लेडीज स्पेशालिस्ट डॉ. शमीला आफरीन (MBBS, DDV) तसेच लेडीज स्पेशालिस्ट डॉ. फरजाना खान (BHMS) यांनी विविध आजारांवर तपासणी करून रुग्णांना योग्य सल्ला व औषधोपचार दिले.
या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील धोराजीवाला फाउंडर ‘होप्स इंडिया’चे हाजी रेहान अनवर साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाहीद सर यांनी केले.
यावेळी कादरीया सोसायटीचे अध्यक्ष शब्बीर नाना साहेब, सचिव हाजी शकील साहेब, उपाध्यक्ष गुलाम दस्तगीर खान सर, राजू ड्रायव्हर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक वॉर्ड क्र. १५ मधील वसीम चेअरमन साहेब, राजू दादांचे चिरंजीव अभिषेक देशमुख साहेब तसेच प्रभाग क्र. १४ मधील इम्रान शब्बीर शेख साहेब उपस्थित होते.
आला हजरत फाउंडेशन, चाळीसगावचे अध्यक्ष मुफ्ती अहमद कादरी, सदस्य इद्रीस बागवान, अकील मन्सुरी, एजाज खान, आसिफ खान, नाजिमोद्दीन काझी, सलीम खान, फिरोज पटवे व मजहर खाटिक यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी दर्गाहचे इमाम मौलाना उस्मान साहेब, त्यांचे पुत्र मुफ्ती अहमद कादरी साहेब (इमाम, मस्जिद शाहीन) तसेच उलमा-ए-अहले सुन्नत यांचीही उपस्थिती होती.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने चाळीसगाव येथे ओ.पी.डी. सेंटरचे उद्घाटन करण्यात आले असून, या केंद्रामार्फत आता नागरिकांना नियमितपणे मोफत तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्र. १३ चे मा. फकीरा मिर्झा तसेच प्रभाग क्र. १४ चे बाबा ठेकेदार हे अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी या उपक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा देत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
