ब्रह्माकुमारीज अनिता दिदींना आध्यात्मिक सेवा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान..

0
New-Doc-01-11-2026-11.16.jpg


परभणी/नांदेड (प्रतिनिधी):
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जीवनसाधना फाऊंडेशन व बीइंग ह्युमन केशव फाऊंडेशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी राजयोगीनी ब्रह्माकुमारीज अनिता दिदी, संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्क, नांदेड यांना “आध्यात्मिक सेवा” राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
समाजात आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, राजयोग ध्यानाद्वारे मानसिक शांती, नैतिकता व सकारात्मक जीवनदृष्टी निर्माण करण्यासाठी अनिता दिदी यांनी केलेल्या दीर्घकालीन सेवाभावी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक व्यक्तींना जीवनात स्थैर्य, संयम व आत्मिक शक्ती प्राप्त झाली असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
या सन्मान सोहळ्यास डॉ. मारोतीराव कदम भाई, डॉ. रामरावजी जाधव भाई, डॉ. आनंदराव मनुरकर भाई, उद्योजक राजेंद्र शंकरपुरे भाई, भगवान कदम भाई, निळकंठ भाई, स्वामी भाई, जोगदंड भाई, रूपेश भाई, डॉ. कल्पना माता जाधव, गोरे माता, जोगदंड माता, शिवलीला बहन, सरोजिनी बहन, स्वामी माता, रोहिणी बहन, सूर्यवंशी भाई यांच्यासह फरांदे पार्क परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन जाधव भाई यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. कल्पना जाधव माता यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजक संस्थांचे कौतुक केले. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अनुसरून सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed