अल-खिदमत ट्रस्टतर्फे अमळनेर मध्ये ओपीडी सेंटरचे भव्य उद्घाटन..

अमळनेर | आबिद शेख
अल-खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या वतीने समाजसेवा व जनकल्याणाच्या उद्देशाने नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या क्लिनिक ओपीडी सेंटरचा भव्य उद्घाटन समारंभ रविवारी दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ८.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी HOPES INDIA चे मा. हाजी रेहान धोराजीवाला, माजी मंत्री व आमदार मा. अनिल भाईदास पाटील, हजरत आमिना ट्रस्ट, मालेगाव येथील मा. डॉ. हामिद इकबाल (MBBS, DCH), अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. डॉ. परिक्षित श्रीराम बाविस्कर, तसेच HOPES INDIA मुंबई व हजरत आमिना ट्रस्ट मालेगाव येथील सर्व सदस्य, अमळनेर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम दुकान नं. ५, इस्लामपुरा मशिद कॉम्प्लेक्स, इस्लामपुरा, अमळनेर, जि. जळगाव येथे पार पडणार आहे. या ओपीडी सेंटरच्या माध्यमातून गरजू नागरिकांना वैद्यकीय सल्ला, उपचार व आरोग्यविषयक मदत मिळणार असून, हे केंद्र शिफा, दिलासा व खिदमतीचे केंद्र ठरेल, अशी भावना ट्रस्टतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
या मंगलप्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहून दुआ देत या नेक उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अल-खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांनी केले आहे.
संपर्क : 8956343309 / 7841873088 / 9764399965
