खा. शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत हरी भिका वाणी यांचा सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय; सभासदांचे मानले आभार…

अमळनेर |आबिद शेख
खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेरच्या त्रैवार्षिक निवडणूक कालावधी २०२६–२०२८ साठी झालेल्या निवडणुकीत हरी भिका वाणी यांची सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने संचालकपदी निवड झाली आहे. या विजयाबद्दल त्यांनी मंडळातील सर्व सन्माननीय सभासद बंधु-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच आपण तिसऱ्यांदा विजयी झाल्याचे सांगत वाणी यांनी व्यापार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना सभासदांशी निर्माण झालेले संबंध अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली. पुढील काळातही हे प्रेम व विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण व आपले आशीर्वाद पॅनल सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही देताना शिक्षणाच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुन्हा एकदा सभासदांचे मनःपूर्वक जाहीर आभार व्यक्त करत, हरी भिका वाणी यांनी मंडळाच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
