खा. शि. मंडळ अध्यक्षपदी विनोद अग्रवाल यांचा ८१ मतांनी विजय; आशीर्वाद पॅनलचे वर्चस्व

0
New-Doc-01-07-2026-07.52.jpg


अमळनेर/ आबिद शेख
खान्देश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विनोद अग्रवाल यांनी ११३० मते मिळवत ८१ मतांच्या आघाडीने विजय मिळवला. त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी लालचंद सैनानी यांना १०४९ मते मिळाली. अध्यक्षपदासाठी एकूण सात उमेदवार रिंगणात होते.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अक्षय अग्रवाल (२७६), विजय जगन्नाथ बोरसे (२७७), डॉ. रवींद्र कुलकर्णी (२४१), राकेश माहेश्वरी (२२७) आणि विक्रम शहा (१४२) यांना मते मिळाली असून ३१४ मते अवैध ठरली.
कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आशीर्वाद पॅनलचे सहा उमेदवार आणि दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
विश्वस्त पदासाठी वसुंधरा लांडगे यांनी २१४६ मते मिळवत विजय मिळवला, तर पुरुषोत्तम शेटे यांना ११४६ मते मिळाली. या निवडणुकीत ३५९ मते बाद ठरली.
उपाध्यक्ष पदासाठी माधुरी पाटील (१८५६ मते) आणि कमल कोचर (१८८८ मते) हे दोन्ही उमेदवार विजयी झाले, तर सचिन बुधा पाटील (११९४ मते) यांना पराभव स्वीकारावा लागला.
संचालक मंडळासाठी पंकज गोविंद मुंदडे (२१६२), प्रदीप कुंदनलाल अग्रवाल (१७१७), हरी भिका वाणी (१६८०), योगेश मधुसूदन मुंदडे (१६७५), लिना प्रविण पाटील (१५९७), निरज दीपचंद अग्रवाल (१५९०), जितेंद्र मोहनलाल जैन (१५४४) आणि डॉ. संदेश बिपीन गुजराथी (१४७१) हे आठ संचालक निवडून आले.
दरम्यान, डॉ. अनिल शिंदे (१४६२) आणि कल्याण पाटील (१४५९) हे विद्यमान संचालक अत्यल्प मतांनी पराभूत झाले असून त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. उशिरा रात्रीपर्यंत फेरमतमोजणी सुरू होती.
म वा मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांना खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. तसेच माजी संचालक दिलीप जैन, प्रवीण जैन आणि विद्यमान अध्यक्ष जितेंद्र झाबक यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंडित चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना चिटणीस प्रा. पराग पाटील, मनोहर महाजन, प्रा. सुनील गरुड आणि विवेक भांडारकर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed