सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमळनेर शाखेत कॅश काऊंटर वाढविण्याची मागणीअखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे निवेदन..

0
New-Doc-01-06-2026-23.17.jpg


अमळनेर /आबिद शेख
ग्राहक पंधरवड्याच्या निमित्ताने दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमळनेर शाखेचे बँक मॅनेजर श्री. विलास पाटील यांना कॅश काऊंटर वाढविण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, सध्या बँकेत कॅश देवाण-घेवाणीसाठी केवळ एकच काऊंटर उपलब्ध आहे. वाढत्या ग्राहकसंख्येमुळे विशेषतः वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत असून, यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रसंगी तातडीच्या कामासाठी आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर बँक प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कॅश काऊंटरची संख्या वाढवावी व ग्राहकांची होणारी अडचण दूर करावी, अशी सूचना वजा विनंती अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे करण्यात आली आहे.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अध्यक्ष सौ. स्मिता चंदात्रे, महिला आयाम प्रमुख ॲड. भारती अग्रवाल, जिल्हा सचिव सतीश देशमुख, जिल्हा उपसचिव मकसूद बोहरी तसेच जिल्हा ऊर्जा प्रमुख सुनील वाघ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed