भालेराव नगर, रामनगर, आर.के. नगर व ड्रीम सिटी परिसरात रात्रीची गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी..

0
New-Doc-03-02-2025-22.23.jpg


अमळनेर /आबिद शेख
भालेराव नगर, रामनगर, आर.के. नगर तसेच ड्रीम सिटी परिसरात अलीकडच्या काळात रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्ती व चोरट्यांचा वावर वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दररोज रात्री चोर परिसरात फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागातील रहिवाशांनी व पत्रकार अमोल पाटील यांनी आदरणीय पी. एस. आय. साहेब यांच्याकडे रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत दुचाकीवरून किंवा पायी काही संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे घरफोडी, चोरी किंवा अन्य अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेषतः महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही काही ठिकाणी किरकोळ चोरीच्या घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाने तातडीने या भागात रात्रीची नियमित गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे तसेच पेट्रोलिंग वाहनांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. पोलीस गस्त वाढल्यास चोरट्यांवर आळा बसेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed