टाकरखेडा येथे अपेरिक्षाचा टायर फुटून अपघात; दोन जण गंभीर जखमी..

0
New-Doc-12-31-2025-07.37.jpg


आबिद शेख/अमळनेर
टाकरखेडा (ता. अमळनेर) येथे अपेरिक्षाचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातग्रस्त अपेरिक्षा चालक गोकुळ संतोष कोळी (रा. कानडदा) यांच्या मालकीची असून रिक्षाचा क्रमांक एम.एच. १९ सी ६९२८ सदर अपेरिक्षा धरणगाव येथून अमळनेरकडे मंगळ ग्रह दर्शनासाठी जात असताना टाकरखेडा परिसरात अचानक टायर फुटल्याने रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात रिक्षामधील दोन प्रवासी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच टाकरखेडा येथील ग्रामस्थांनी तातडीने मदतीस धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांना रिक्षेतून सुखरूप बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed