नॅशनल हायस्कूल चाळीसगावच्या २४ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षा उत्साहात दिली..

24 प्राईम न्यूज 29 Dec 2025
चाळीसगाव :नॅशनल हायस्कूल, चाळीसगाव येथील इयत्ता आठवीतील (8th) एकूण २४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज ए. बी. हायस्कूल, चाळीसगाव येथे आयोजित एनएमएमएस (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात दिली.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दीर्घकाळ मेहनत व सातत्यपूर्ण अभ्यास केला होता. परीक्षेदरम्यान सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने व चिकाटीने प्रश्नपत्रिका सोडवली. शांत व शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा पार पडली.
एनएमएमएस परीक्षा ही गुणवंत व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची शिष्यवृत्ती परीक्षा असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळतो. त्यामुळे या परीक्षेला विशेष महत्त्व आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करावे, आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे कष्ट आणि शाळेचे नाव उज्ज्वल करावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना व शुभेच्छा शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत.
