अमळनेर तालुका कुस्तीगीर संघातर्फे तालुका निवड चाचणी स्पर्धा १ जानेवारी रोजी…

अमळनेर /आबिद शेख
अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने सन २०२५–२०२६ या कालावधीतील राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेसाठी जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती निवडीकरिता अमळनेर तालुका संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही निवड चाचणी दिनांक १ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी क्रीडा संकुल, प्रताप कॉलेजजवळ, अमळनेर येथे आयोजित करण्यात आली असून सकाळी १०:३० वाजता कुस्ती स्पर्धांना प्रारंभ होणार आहे.
या निवड चाचणीत १५, १७, २० वर्षांखालील गट, तसेच फ्री-स्टाईल व ग्रीको-रोमन प्रकार, मुलींचे गट, तसेच वरिष्ठ ग्रीको-रोमन व फ्री-स्टाईल गादी व माती प्रकारांचा समावेश राहणार आहे. वजन गट ८ ते १० पर्यंत असणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जन्मतारीख असलेल्या खेळाडूंनी मेडिकल सर्टिफिकेट व पालकांचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच सर्व खेळाडूंनी आधार कार्ड व पासपोर्ट साईज फोटोची झेरॉक्स प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे.
या निवड चाचणी स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी
श्री. विश्वास संतोष पाटील (बाळू)
तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष संजय कौतिक पाटील,
हाजी शब्बीर पैलवान, प्रताप अशोक शिंपी, संजय पैलवान, रावसाहेब पाटील, भरत पवार, प्रवीण पाटील (तांत्रिक समिती)
यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक :
8329516500 / 9028305730 / 9604433714
तरी अमळनेर तालुक्यातील सर्व कुस्तीपटूंनी या निवड चाचणी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमळनेर तालुका कुस्तीगीर संघातर्फे करण्यात आले आहे.
