लोकशाहीचा उत्सव यशस्वी करणाऱ्या मतदारांचे शिवसेना गटनेते पंकज पंडीत चौधरी यांचे अभिनंदन व आभार..

0
New-Doc-12-27-2025-07.24.jpg


अमळनेर | आबिद शेख
अमळनेर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लोकशाहीचा उत्सव यशस्वी करणाऱ्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते पंकज पंडीत चौधरी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. जनतेने दिलेल्या स्पष्ट आणि ठाम कौलातून अमळनेरच्या उज्ज्वल भविष्यासाठी विश्वास व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत मिळालेला कौल हा केवळ विजयाचा नसून, तो जनतेच्या विश्वासाचा सन्मान असल्याचे मत व्यक्त करत चौधरी म्हणाले की, “मतदारांनी माझ्यावर आणि शिवसेनेवर जो विश्वास दाखवला आहे, त्याची जाणीव ठेवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रामाणिकपणे कार्यरत राहीन.”
पुढे बोलताना त्यांनी शहरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जाईल, असा विश्वास नागरिकांना दिला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न नगरपरिषदेत प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
लोकशाही प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक मतदाराचे आभार मानत, अमळनेरच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed