जि. प. प्रा. शाळा उदयनगर येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न..

आबिद शेख/अमळनेर
जि. प. प्राथमिक शाळा, उदयनगर येथे दिनांक २४ डिसेंबर २०२५, बुधवार रोजी बालकांचा बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या मेळाव्यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला.
या कार्यक्रमास सर्वांचे लाडके सरपंच प्रकाश वाघ, सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, सुदाम सोनवणे, माजी उपसरपंच सोनू पाटील, माजी सदस्य सतीश पाटील, योगेश पाटील, डॉ. जितेंद्र पाटील, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी जितेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, सुभाष पाटील, सुधीर सोनवणे, ग्रामसेविका सोनी पाटील उपस्थित होते. याशिवाय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश पाटील व त्यांची टीम, आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी आजी-माजी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात कार्यरत गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बाल आनंद मेळाव्यात उपस्थित ग्रामस्थांनी चिमुकल्यांच्या स्टॉलवरून खाऊ खरेदी करत त्यांचा उत्साह वाढवला. त्यामुळे शाळेतील सर्वच विद्यार्थी आनंदित झाले आणि मेळावा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला. यावेळी सोनू पाटील यांनी जारच्या पाण्याची व्यवस्था करून सहकार्य केले, त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रविंद्र मासुळे यांनी केले, तर नितीन शिंदे सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. अत्यंत खेळीमेळीच्या आणि आनंदी वातावरणात हा बाल आनंद मेळावा संपन्न झाला.
बाल आनंद मेळाव्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व बंधू-भगिनींचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
