अमळनेर नगरपालिकेत १ तारखेला सत्ता स्थापन होणार; माजी आ. शिरीष चौधरी यांचे सुतोवाच..

अमळनेर | आबिद शेख
अमळनेर नगरपालिकेत येत्या १ तारखेला सत्ता स्थापन करण्यात येईल, असे स्पष्ट सुतोवाच माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केले. अमळनेरच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर भूमिका मांडताना चौधरी यांनी सांगितले की, “आमिष दाखवून नव्हे, तर जनतेला अपेक्षित असलेले अमळनेर घडवायचे आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
माजी आमदार चौधरी म्हणाले की, परवा दोन गटांची स्थापना करण्यात आली असून, या दोन गटांमुळे स्वीकृत नगरसेवकांची संख्या एकाने वाढली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे.
सत्तेच्या वाटपाबाबत माहिती देताना चौधरी यांनी सांगितले की, सत्तेतील प्रत्येक समाजघटकाला सहकार (को-ऑप) मध्ये एक-एक वर्ष नगरसेवकपदाची संधी देण्याचा निर्णय ठरलेला आहे. हा निर्णय सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय टीका करताना चौधरी यांनी आमदार अनिल पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “नंदुरबारमध्ये आमचा पाटा पाडणार असल्याचे वक्तव्य केले गेले होते. मात्र ज्या पक्षाचे ते आहेत, त्या पक्षाचा एकही नगरसेवक नंदुरबारमध्ये निवडून आला नाही. उलट अमळनेरच्या मतदारांनी त्यांचाच पाटा पाडला आहे. मंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीच्या अर्थागणीत अत्यंत कमी मते पडणे ही लाजिरवाणी बाब आहे.”
तसेच, पारोळा येथील आमदारांनी ‘चाटमाऱ्या’ या शब्दाबाबत केलेले विधान आज खरे ठरले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या नेत्या अॅड. ललिता पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, गट नेते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
