डी. आर. कन्या शाळेच्या कबड्डी संघाचा दुहेरी मुकुट ; पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते सत्कार.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर किर्डा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आयोजित शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत अमळनेर येथील डी. आर. कन्या शाळेच्या माध्यमिक मोठा गटाच्या संघाने घवघवीत यश संपादन करत विजेतेपद पटकावले आहे.
या विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या हस्ते बुके व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी त्यांनी संघाचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हास्तरीय स्पर्धा दि. 29 व 30 रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे मॅटवर होणार आहेत.
*विजयी संघातील खेळाडू :*
कर्णधार अश्मिरा शाकिर शेख, उपकर्णधार पूर्वा निकुंबे, कावेरी पाटील, कल्याणी पारधी, केतकी देशपांडे, ईशा पाटील, मयुरी पवार, लिना गुरव, कामिनी सोनवणे, वैष्णवी पाटील, समीक्षा जाधव, रिशिका गोयल, स्नेहल पाटील, मोनिका भोई.
या खेळाडूंनी दोन्ही गटात विजय मिळवून दुहेरी मुकुटासह जिल्हास्तरावर पात्रता मिळवली आहे.
या यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, कार्यालय प्रमुख शाम पवार, एस. एस. माळी, आर. एस. सोनवणे, किरण सनेर यांनी अभिनंदन केले.
विजयी संघाला क्रीडा विभाग प्रमुख राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

