अंबाऋषी टेकडीवर कचरा टाकून पेटविला; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष, 8 दिवसात कारवाई नाही तर कचरा नगरपरिषदेत टाकून आंदोलनाचा इशारा.

0

अमळनेर /आबिद शेख 

अमळनेर  शहरातील अंबाऋषी टेकडी परिसरात वारंवार कचरा टाकून तो पेटविला जात असल्याने परिसरात दुर्गंधी व प्रदूषण पसरले आहे. या समस्येबाबत यापूर्वी नगरपरिषद, पोलीस आणि संबंधित प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देऊनही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा ट्रस्टच्या सदस्यांनी केला आहे.

सलग तीन दिवस कचरा टाकून तो पेटविण्याचा प्रकार घडूनही आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने तातडीने कचरा टाकणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि टेकडी परिसरात कचरा टाकण्याचे प्रकार कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे.

*आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा*

आठ दिवसांत योग्य कार्यवाही न झाल्यास कचरा थेट नगरपरिषदेत आणून टाकण्यात येईल व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद आणि घनकचरा ठेकेदाराची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय अधिकारी अमळनेर आणि पोलीस निरीक्षक अमळनेर यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed