जळगावचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. इक्बाल शाह यांचे निधन..

0
IMG-20251223-WA0006.jpg

24 प्राईम न्यूज 23 Dec 2025

जळगाव: शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत आदरणीय, सुसंस्कृत व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व प्रा. डॉ. इक्बाल शाह मजीद शाह यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

प्रा. डॉ. इक्बाल शाह यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केले होते. ते इकरा एज्युकेशन सोसायटी तसेच मिल्लत एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शैक्षणिक संस्थांनी लक्षणीय प्रगती केली असून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या.

अंत्यसंस्काराची माहिती:
मंगळवार, 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा सालार नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघून मोठ्या कब्रस्तानात जाणार आहे.

त्यांच्या पश्चात 3 पुत्र व 4 कन्या असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना व नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली व शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो व कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed