प्रभाग क्र. १८ (ब) मधून सौ. रुपाली विलास शिवदे यांचा दणदणीत विजय; १९५६ मतांनी मतदारांचा कौल..

0
New-Doc-12-22-2025-07.14.jpg


अमळनेर |आबिद शेख
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (ब) सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघातून सौ. रुपाली विलास शिवदे यांनी १९५६ मतांची भक्कम आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयामुळे प्रभागातील मतदारांनी त्यांच्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे स्पष्ट प्रतिबिंब दिसून आले आहे.
सौ. शिवदे यांच्या विजयामुळे समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला. त्यांच्या विजयानंतर सामाजिक, राजकीय व विविध संघटनांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान सौ. रुपाली शिवदे यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांचा विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिलांचे सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला होता. त्यांच्या कार्यपद्धतीवर व सर्वसामान्यांशी असलेल्या थेट संवादामुळे मतदारांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिल्याचे चित्र दिसून आले.
विजयानंतर बोलताना सौ. रुपाली शिवदे यांनी मतदारांचे आभार मानत, “प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन विकासकामांना प्राधान्य देणार आहे,” अशी भावना व्यक्त केली.
या विजयामुळे प्रभाग क्र. १८ (ब) मध्ये नव्या विकास पर्वाची सुरुवात होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed