प्रभाग १ (अ) मधून राजपूत कविता विजय यांचा दणदणीत विजय; १३५० मतांनी मतदारांचा ठाम विश्वास..


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ (अ) सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघातून राजपूत कविता विजय यांनी १३५० मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांच्या या विजयाने प्रभागात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान राजपूत कविता विजय यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत नागरिकांशी थेट संवाद साधला होता. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला व युवकांचे सक्षमीकरण, तसेच आरोग्य व शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणावर त्यांनी भर दिला. त्यांच्या साध्या, स्पष्ट आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे मतदारांनी त्यांना भरघोस पाठिंबा दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
विजयानंतर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले. “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील,” अशी प्रतिक्रिया राजपूत कविता विजय यांनी दिली.
या विजयामुळे प्रभाग क्रमांक १ (अ) मधील नागरिकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या असून, आगामी काळात मूलभूत सुविधा, विकासकामे आणि लोकाभिमुख निर्णयांद्वारे प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याची आशा व्यक्त केली जात आहे. राजपूत कविता विजय यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मतदारांमध्ये दिसून येत आहे.
