डी. आर. कन्या शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन..

0
New-Doc-12-21-2025-07.55.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर | दि. २० डिसेंबर खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती डी. आर. कन्या शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू गिरीश प्रताप पवार यांच्या हस्ते पार पडले.
विजय मारुती मंदिरापासून शाळेपर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत शाळेतील विभागीय व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या खेळाडू, स्काऊट-गाईड तसेच विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅली शाळा परिसरात आल्यानंतर दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, मशाल प्रज्वलन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचा लोगो फुग्यांच्या साहाय्याने आकाशात सोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास राष्ट्रीय खेळाडू विजेंद्र जाधव, योगेश पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी डी. एन. पालवे, क्रीडा शिक्षक के. आर. बाविस्कर, श्रीमती आर. एस. सोनवणे, एस. एस. माळी तसेच ज्येष्ठ लिपिक शाम पवार उपस्थित होते.
यावेळी शाळेतील राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविलेल्या खेळाडूंचा तसेच गाईड विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नूतन भोई, लक्ष्मी बंजारा, दृष्टी बडगुजर यांच्यासह गाईड शिक्षिका श्रीमती वाय. एम. पाटील यांचा समावेश होता.
प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू गिरीश प्रताप पवार यांनी आपल्या क्रीडा प्रवासाचा अनुभव सांगत विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ व नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डी. एन. पालवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed