इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क इंग्लिश उजळणी व्याख्यानमाला – PTA महाराष्ट्र राज्यचा उपक्रम आज..
आबिद शेख/अमळनेर
इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची परीक्षाभिमुख तयारी अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA), महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “परीक्षेला जाता जाता…” या शीर्षकाखाली यशवंत PTA निःशुल्क इंग्लिश उजळणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत असून अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हा ऑनलाईन कार्यक्रम शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत YouTube Live Lecture माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. या दोन तासांच्या व्याख्यानात इयत्ता १२ वीच्या इंग्रजी विषयाची संपूर्ण, नेमकी व परीक्षाभिमुख उजळणी करून दिली जाणार आहे.
या निःशुल्क व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीनिवास इंग्लिश अकॅडमी, जळगाव येथील प्रसिद्ध इंग्रजी विषयतज्ज्ञ श्री. व्यंकटेश राजन अय्यंगार (अय्यंगार सर) हे मार्गदर्शन करणार आहेत. परीक्षेच्या अंतिम टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान निर्णायक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमास PTA महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष श्री. प्रशांत कासार सर, महासचिव श्री. मोहन गावडे सर, जळगाव PTA चे अध्यक्ष श्री. सुरेश राजपूत सर, उपाध्यक्ष श्री. हर्षल ठाकूर सर तसेच PTA ची राज्य कोअर टीम व विविध क्लास संचालक प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील जास्तीत जास्त इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी या निःशुल्क संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन PTA तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भैय्यासाहेब मगर सर (मो. ९४२३९०४४८३) यांच्याशी संपर्क साधावा.

