पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे १०० किलोवॉट क्षमतेचा सोलर प्लांट कार्यान्वित..
24 प्राईम न्यूज 19 Dec 2025
मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे Sunstroat Green Technology Pvt. Ltd. या कंपनीचा १०० किलोवॉट क्षमतेचा सोलर प्लांट उभारण्यात आला असून, सदर सोलर प्लांटचे उद्घाटन मा. श्री. रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधीक्षक जळगाव भाग, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा आदी विविध संगणकीकृत शाखा कार्यरत आहेत. या सर्व कार्यालयांचा मिळून महिन्याकाठी अंदाजे १० हजार ते ११ हजार युनिट्स वीज वापर होत असतो.
नव्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या छतावर सुमारे ४००० ते ५००० स्क्वेअर फूट जागेत एकूण १८४ सोलर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. या सोलर प्लांटमुळे दररोज किमान ३०० युनिट्स वीज निर्मिती होणार असून, उन्हाळ्यात ही क्षमता ४०० ते ४५० युनिट्सपर्यंत जाणार आहे. त्यामुळे कार्यालयाचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून अतिरिक्त वीज निर्मितीमुळे पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.
सदर उद्घाटनप्रसंगी मा. श्री. रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव, मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्री. आव्हाड, पोलीस उपअधीक्षक (गृह), मा. श्री. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग, श्री. सतीश गोराडे, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा जळगाव, श्री. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, श्री. प्रशांत सुगरवार, राखीव पोलीस निरीक्षक जळगाव आदी अधिकारी उपस्थित होते.
