आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक पं. विवेक सोनार यांचे अमळनेर मध्ये शास्त्रीय बासरी वादन..
आबिद शेख/अमळनेर
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय बासरीवादक पंडित विवेक सोनार यांच्या बासरी वादनाचा मैफिलीनुमा कार्यक्रम शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात तबला संगत पंडित समीर सूर्यवंशी करणार असून बासरी व तबल्याच्या सुरेल जुगलबंदीचा रसिकांना मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
हा कार्यक्रम जी. एस. हायस्कूल, लायन्स सभागृह, अमळनेर येथे संपन्न होणार असून प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
शास्त्रीय संगीताची आवड असलेल्या सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल संध्याकाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
