प्रभाग १ (अ) मध्ये जोरदार चर्चा-राजपूत कविता विजय यांच्या उमेदवारीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; “शिटी” निशाणीवर विजय निश्चित..

0
New-Doc-12-17-2025-06.58.jpg

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १(अ) सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघातून राजपूत कविता विजय यांनी उमेदवारी जाहीर केल्यापासून प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “शिटी “ही त्यांची निवडणूक निशाणी असून, या प्रतीकाभोवती मोठी चळवळ उभी राहत असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळते.प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असलेल्या राजपूत कविता विजय या साधेपणा, लोकाभिमुख दृष्टीकोन आणि प्रामाणिक जनसेवेच्या माध्यमातून प्रभागात वेगळी छाप पाडताना दिसत आहेत. घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन मांडणे-या तिन्ही गोष्टींनी मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक विश्वास निर्माण केला आहे.

विशेषतः महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता लक्षणीय वाढताना दिसत आहे. महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि दिलेल्या आश्वासनांमुळे महिला मतदार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभ्या राहत आहेत. युवकांशी केलेला संवाद व प्रभागातील विकासासंदर्भातील त्यांचे स्पष्ट धोरण हे देखील चर्चेचा विषय ठरत आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही त्यांचा विनम्र आणि संवादशील स्वभाव भावत असून अनेकांनी खुलेपणाने त्यांना समर्थन व्यक्त केले आहे दरम्यान, प्रभागातील राजकीय वातावरण तापू लागले असले तरी चर्चेचा केंद्रबिंदू मात्र एकच – “प्रभाग १ (अ) मधून राजपूत कविता विजय यांचा विजय निश्चित आहे का स्थानिकांत वाढत चाललेला उत्साह, त्यांना मिळणारा मोठा लोकसमर्थन आणि प्रभागाच्या समस्यांवरील त्यांचे स्पष्ट धोरण पाहता या चर्चेला वेग आला आहे.

राजपूत कविता विजय यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरत असून ‘ शिटी ‘ चिन्ह प्रभागात सर्वाधिक चर्चेत असलेले प्रतीक ठरत आहे. आता मतदारांची अंतिम पसंती कोणाला मिळते हे २१ डिसेंबर नंतरच स्पष्ट होईल, पण सध्या तरी प्रभाग १ (अ) मध्ये राजपूत कविता विजय यांच्या उमेदवारीला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिक बळावल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed