उदयोन्मुख तंत्रज्ञान व मनोरंजनात्मक गणितीय मॉडेल्सची छाप; ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सानेगुरुजी विद्यालय प्रथम..

0
New-Doc-12-17-2025-23.08.jpg

आबिद शेख/अमळनेर
पंचायत समिती शिक्षण विभाग व सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सानेगुरुजी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावून यशाची परंपरा कायम राखली. यंदाच्या प्रदर्शनात उदयोन्मुख तंत्रज्ञान व मनोरंजनात्मक गणितीय मॉडेल्स या विषयांवरील उपकरणांची विशेष भर विद्यार्थ्यांकडून पाहायला मिळाली.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण व उपशिक्षणाधिकारी प्रतिमा सानप यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा होते. व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, गटसमन्वयक रवींद्र साळुंखे, प्राचार्य जितेंद्र सिंह, लक्ष्मण, विनोद अमृतकार यांच्यासह केंद्रप्रमुख व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे, गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर, कार्याध्यक्ष संजय पाटील, भाग्यश्री वानखेडे, डॅफोडील सोनवणे, नवनीत सपकाळे यांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धेतील विजेते :
प्राथमिक गट – प्रथम गीतेश निकम (सानेगुरुजी विद्यालय), द्वितीय समीक्षा बिऱ्हाडे (डी. आर. कन्याशाळा), तृतीय जयेश पाटील (लोंढवे हायस्कूल). उत्तेजनार्थ हितीका चोरडिया (सायरदेवी बोहरा स्कूल), ललित पाटील (के. पी. सोनार विद्यालय).

माध्यमिक गट – प्रथम शुभम पाटील (सानेगुरुजी विद्यालय), द्वितीय योगेश पाटील (सायरदेवी बोहरा स्कूल), तृतीय तनिष्का पाटील (एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूल). उत्तेजनार्थ तमन्ना पावरा (यशवंत आश्रमशाळा पिंपळे), राजविर पाटील (सेंट मेरी हायस्कूल).

प्राथमिक शिक्षक गट – प्रथम पल्लवी पाटील (जैतपिर हायस्कूल), द्वितीय अर्जुन वसावे (जि. प. शाळा टाकरखेडा), तृतीय ऋत्विक जैन (एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूल).

माध्यमिक शिक्षक गट – प्रथम यशोदा शिंदे (सायरदेवी बोहरा स्कूल), द्वितीय डॉ. भाग्यश्री वानखेडे (जययोगेश्वर विद्यालय), तृतीय आकाश पाटील (नगाव हायस्कूल).

प्रयोगशाळा परिचर गट – प्रथम भाग्यश्री थोरात (सायरदेवी बोहरा स्कूल).

बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संजय पाटील होते. विजेत्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. परीक्षक म्हणून नवनीत सपकाळे, भुपेंद्र पाटील, पी. सी. पाटील, शैलेंद्र चव्हाण यांनी काम पाहिले.

प्राचार्य जितेंद्र सिंह, मुकेश पाटील, नवनीत सपकाळे व रवींद्र साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजय पाटील, निरंजन पेंढारे व अलसीन पॉम यांनी केले तर आभार नेहा गुरव यांनी मानले.

सायरदेवी बोहरा स्कूलतर्फे उत्कृष्ट सजावटीतून विज्ञानमय वातावरण निर्माण करण्यात आले होते. विद्यार्थी व शिक्षकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. अमळनेर तालुक्यातून माध्यमिक गटातील ३३, उच्च प्राथमिक गटातील ३४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एकूण आठ उपकरणे प्रदर्शनात मांडण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed