प्रभाग १ (अ) मधून राजपूत कविता विजय “शिटी” निशाणीवर विकासाची नवीन आशा..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १(अ) सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघातून तालुका शहर विकास आघाडीतर्फे राजपूत कविता विजय यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच प्रभागभर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून मतदारांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्या आहेत.

साधेपणा, लोकाभिमुख दृष्टीकोन आणि प्रामाणिक जनसेवेची ओढ या तीन बळावर राजपूत कविता विजय या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी सातत्याने संवाद साधत नागरिकांच्या छोट्या-मोठ्या अडचणी जाणून घेतल्या असून त्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
“फक्त गर्दी करण्यासाठी किंवा लोकप्रियता मिळवण्यासाठी राजकारणात आलेले नाही. लोकांच्या विश्वासाला न्याय द्यावा आणि त्यांच्या समस्या कमी कराव्यात, हा एकच हेतू घेऊन मी उमेदवारी स्वीकारली आहे,” असे त्यांनी भावना व्यक्त करत सांगितले.
आपल्या जाहीरनामा व संवादातून त्यांनी महिलांची सुरक्षा, नियमित व सुरळीत पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता व्यवस्थेची मजबुती, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा, वृद्धांसाठी विविध मदत योजनांचे सुलभीकरण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर तातडीने काम करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
लोकांच्या प्रश्नांशी थेट नाळ जोडणारी, संवेदनशील आणि कामाला प्राधान्य देणारी उमेदवार म्हणून राजपूत कविता विजय यांच्याकडे पाहिले जात असून प्रभाग १(अ) मधील निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
