खानदेश शिक्षण मंडळ अमळनेर निवडणूक 2025.          स्वतंत्र अपक्ष उमेदवारांची आज बैठक; संयुक्त प्रचाराचा निर्णय घेण्याची शक्यता..

0
New-Doc-12-16-2025-10.18.jpg

आबिद शेख/अमळनेर

खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेरच्या 2025 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र अपक्ष उमेदवारी करणाऱ्या सर्व सन्माननीय उमेदवारांची महत्त्वाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आज दुपारी 4:30 वाजता अर्बन बँकेच्या शेजारील वाड्यात होणार आहे.

या बैठकीस माननीय अध्यक्ष पद, माननीय उपाध्यक्ष पद, माननीय विश्वस्त, कार्यकारी सदस्य, तसेच संचालक मंडळ (डायरेक्टर) पदासाठी निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत. सर्व अपक्ष उमेदवारांनी एकत्र येऊन संयुक्त प्रचार करण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात येणार आहे.

तसेच, प्रत्येक उमेदवाराने आपला स्वतंत्र हॅन्डबिल/जाहीरनामा तयार करून सन्माननीय मतदारांकडे मत मागण्यासाठी एकत्रितपणे प्रचार करण्याचे नियोजन बैठकीत ठरविले जाण्याची शक्यता आहे. संघटित प्रयत्नांद्वारे प्रचंड मताधिक्याने विजय मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसाद रमेशचंद्र शर्मा, कार्यकारी मंडळ सदस्य उमेदवार (2025–2028) यांनी केले आहे. यावेळी जय श्रीमंत प्रताप शेठजी, जय श्रीमंत भांडारकरजी परिवार, श्रीमंत बंगालीजी परिवार, तसेच सर्व लहान–मोठ्या दानशूरांचे नमन करण्यात आले.

सर्व सन्माननीय उमेदवारांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed