वारीहून परतलेल्या प.पू. प्रसाद महाराजांचे अमळनेरमध्ये भक्तिभावात भव्य स्वागत..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर वारकरी संप्रदायातील महान संत, कीर्तनकार व समाजप्रबोधक संत सखाराम महाराज यांच्या गादीपुरुष प.पू. गुरुवर्य प्रसाद महाराज यांच्या पंढरपूर वारीहून परत येताना सोमवारी अमळनेर नगरात श्रद्धा व भक्तिभावाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.

सकाळी ११ वाजता प.पू. प्रसाद महाराजांचे खार्टेश्वर महादेव मंदिरात आगमन झाले. यावेळी वारकरी, भाविक व नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत महाराजांचे स्वागत केले. संत सखाराम महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनात विठ्ठल नामाचा जयघोष करीत भक्ती, सदाचार व मानवतेचा संदेश दिला असून त्यांची वारी ही केवळ यात्रा नसून आध्यात्मिक साधनेचे प्रतीक मानली जाते. प.पू. प्रसाद महाराज यांच्या वारीदरम्यान अभंग, हरिनाम, कीर्तन व प्रवचनांनी संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला होता.
खार्टेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जितेंद्र ठाकुर यांनी पत्नीसमवेत पुष्पहार अर्पण करून महाराजांचे स्वागत केले. त्यानंतर प.पू. प्रसाद महाराजांनी वरणेश्वर महादेव व पंचमुखी महादेव मंदिरातही दर्शन घेतले.
नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी गणेश शिंदे, आमदार अनिल पाटील, जितेंद्र ठाकुर, विनोद लाम्बोले, किरण कंडारे, संजय चौधरी, संजय पाटील आदी मान्यवरांनी महाराजांचे स्वागत केले. यावेळी अनिता लाम्बोले यांनी आरती व औक्षण केले.
या स्वागत सोहळ्यास महेश कोठावदे, अनिल जोशी, केतन जोशी, मनोज देवकर, डॉ. चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, प्रताप साळी, अरुण बापू पाटील, सुनील शिंपी, अभिजित भांडारकर, मनोज भांडारकर, विनोद महाजन, प्रवीण पाठक, पंकज चौधरी, श्याम पाटील, नितीन भदाणे, झुलाल पाटील, किरण पाटील, संजय भिल्ला पाटील, दिलीप भावसार, पांडुरंग भोई, रूपाली शिवदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिष्य परिवार व भाविक उपस्थित होते.
