अमळनेरात हॉस्पिटलसमोरून शाईन दुचाकीची चोरी; चोर सीसीटीव्हीत कैद..

0
New-Doc-12-15-2025-07.39.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर शहरातील डॉ. मुठे यांच्या गणेश हॉस्पिटलसमोरून लाल रंगाची शाईन मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दुपारी साडे चारच्या सुमारास घडली आहे. जयेश संजय जगताप यांच्या मालकीची एमएच 19 सीसी 2081 क्रमांकाची ही दुचाकी आहे.

साने गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक संजय जगताप हे डोळे तपासणीसाठी गणेश हॉस्पिटलमध्ये गेले होते. हॉस्पिटलच्या बाहेर त्यांनी आपली मोटरसायकल उभी केली होती. तपासणी आटोपून बाहेर आल्यानंतर मोटरसायकल जागेवर न दिसल्याने त्यांनी तात्काळ परिसरात शोध घेतला. मात्र दुचाकी न सापडल्याने अखेर अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, ही चोरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed