प्रेमसंबंधातून मानसिक छळ; १८ वर्षीय विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.       राज भिल विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल..

0
New-Doc-12-15-2025-07.27.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील गांधली शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली असून, बारावीला शिकणाऱ्या १८ वर्षीय जयश्री संदानशिव या विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुण विजय उर्फ राज विलास बागुल (भिल) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत जयश्री संदानशिव (वय १८) ही अमळगाव येथील आदर्श विद्यालयात बारावी आर्ट्स शाखेत शिक्षण घेत होती. दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ती घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. याबाबत तिच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी गावातील नागरिकांनी गांधली शिवारातील धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली. घटनास्थळी पाहणी केली असता सदर मृतदेह जयश्री संदानशिव हिचाच असल्याची खात्री झाली. त्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मयत जयश्रीचे वडील यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, जयश्रीचे गावातील विजय उर्फ राज विलास बागुल याच्याशी प्रेमसंबंध होते. मागील काही महिन्यांपासून त्याच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे ती नैराश्यात होती. याच मानसिक छळाला कंटाळून जयश्रीने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी विजय उर्फ राज विलास बागुल (भिल) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed