शिरसाळे येथील साने गुरुजी शिक्षण मंडळात बोगस भरतींचा गंभीर आरोप.               तक्रारींना केराची टोपली; भरत शांताराम चौधरी यांची पत्रकार परिषदेतून खळबळ..

0
New-Doc-12-14-2025-11.33.jpg

आबिद शेख/अमळनेर
पूज्य श्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, शिरसाळे संचलित भिका यशोध चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या काही वर्षांत कथित बोगस भरती करून शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व जनरल सभासद भरत शांताराम चौधरी यांनी केला आहे. या प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण आयुक्त (पुणे), एसआयटी प्रमुख, शिक्षण उपसंचालक (नाशिक) तसेच शिक्षण सचिव (मुंबई) यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण जनतेसमोर मांडावे लागत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

तक्रारीनुसार, आर. एस. फयाजुद्दीन यांची १२ जून २०१३ रोजी शिपाई म्हणून नियुक्ती झाल्याचे दाखवण्यात आले असले तरी त्या काळातील तत्कालीन मुख्याध्यापक मधुकर उघडू चौधरी यांनी त्यांच्या कार्यकाळात अशी कोणतीही भरती झालेली नसल्याचे लेखी स्वरूपात नमूद केले आहे. तसेच हर्षल दीपक चौधरी यांची १२ जून २०१५ रोजी झालेली नियुक्तीही संशयास्पद असून, तत्कालीन मुख्याध्यापक रवींद्र पांडुरंग मुसळे यांनी ती बोगस असल्याचा आरोप केला आहे.

याशिवाय २०१६ व २०१७ या कालावधीत हेमंत जयप्रकाश नेरकर, सुनीता लोटन पाटील, शितल सोमनाथ चौधरी, प्रियंका स्वप्निल पवार, वैशाली रविंद्र पाटील व भाग्यश्री निलेश पाटील अशा अनेकांची भरती नियमबाह्य पद्धतीने केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे काही कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष दिलेले वेतन आणि शासकीय मान्यतेनुसार मिळायला हवे असलेले वेतन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed