खान्देश शिक्षण मंडळ निवडणुकीत डॉ. अविनाश जोशी अपक्ष मैदानात..

0
New-Doc-12-13-2025-07.37.jpg


आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या निवडणुकीत अमळनेर येथील नामांकित हृदय रोगतज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे. खान्देश शिक्षण मंडळाअंतर्गत प्रताप महाविद्यालयासह विविध पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच शहरातील नामांकित माध्यमिक व प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. मात्र सध्याच्या काळात मंडळाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत असून शैक्षणिक गुणवत्तेत घसरण झाल्याच्या चर्चा होत आहेत. एकेकाळी राज्यात नावलौकिक असलेले प्रताप महाविद्यालय आज गुणवत्तेऐवजी राजकारणाच्या भोवऱ्यात अडकले असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक गुणवत्ता व पारदर्शक कारभार पुन्हा उभा करण्यासाठी डॉ. अविनाश जोशी यांचे नाव पुढे येत आहे. वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉ. जोशी यांनी अमळनेर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिक्षणप्रेमी व गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तींना खान्देश शिक्षण मंडळात स्थान मिळावे, या अपेक्षेने त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष वेधले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed