२४ चोरीच्या मोटरसायकली जप्त करणाऱ्या अमळनेर पोलिसांचा सन्मान; उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान..

0
New-Doc-12-13-2025-07.20.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक 308/2025 (BNS कलम 303(2)) अन्वये नोंद असलेल्या मोटरसायकल चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावत आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेली एक मोटरसायकल तसेच अन्य 23 मोटरसायकली असा एकूण 24 मोटरसायकलचा मोठा साठा जप्त करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे.

या उल्लेखनीय कारवाईत विनोद सोनवणे, मयूर पाटील व भूषण परदेशी यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत माननीय जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक सो. श्री महेश्वर रेड्डी यांनी त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविले. या यशस्वी तपासामुळे शहर व परिसरातील मोटरसायकल चोरीच्या घटनांवर प्रभावी आळा बसण्यास मदत झाली आहे.

या सन्मानाबद्दल सुनील तेली सह इतर सन्माननीय पोलिस बांधवांचे सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. अमळनेर पोलिसांनी दाखवलेली तत्परता, कुशल तपास व समन्वयामुळे मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेल्या वाहनांची जप्ती शक्य झाली असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed