२२ वर्षांच्या सेवेअंती अतुल बाविस्कर सेवानिवृत्त; गांधलीत वाजतगाजत भव्य स्वागत..

0
New-Doc-12-11-2025-07.19.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर तालुका – गांधली येथील रहिवासी अतुल निंबाजी बाविस्कर हे २२ वर्षांची खडतर व उल्लेखनीय सेवा पूर्ण करून ३० नोव्हेंबर रोजी भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त ४ डिसेंबर रोजी गांधली गावातून वाजत गाजत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत बाविस्कर यांचा संपूर्ण परिवार, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच सेवानिवृत्त सैनिकांची सुरक्षा रक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापूर्वी अमळनेर रेल्वे स्थानकावरही अतुल बाविस्कर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सरपंच नरेंद्र पाटील, महेंद्र पाटील, रिता ताई बाविस्कर यांनी त्यांचे सत्कार केले, तर खासदार स्मिता ताई वाघ यांनीही शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, अतुल बाविस्कर यांचे लहान बंधू राहुल पाटील हे सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असून, मोठा भाऊ सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते सीमावर्ती भागात आपले कर्तव्य बजावत राहणार आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 128200

22 Ct सोने 91.60% : ₹. 118000

18 Ct सोने 75.00% : ₹. 97500

शुद्ध चांदी 999%:₹. 1850/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed