सेबी व आधार संस्थेकडून बचत गटातील 70 महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – आधार संस्था आयोजित स्वामींनी प्रकल्पा अंतर्गत बचत गटातील 70 महिलांसाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण जिजाऊ हॉल येथे 10 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले.

प्रशिक्षणासाठी सेबी मुंबईचे सीए राजेंद्र नेरपगार यांनी उपस्थित राहून आर्थिक नियोजन, उद्योग–व्यवसाय, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड व विविध गुंतवणूक साधनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या सत्काराने झाली. सूत्रसंचालन अश्विनी भदाणे यांनी उत्तमरित्या पार पाडले. प्रशिक्षण सत्रासाठी प्रो. विजयकुमार वाघमारे, डॉ. भारती पाटील व रेणू प्रसाद मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी महिलांना आर्थिक शिस्त, बचत, गुंतवणूक आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाविषयी उपयुक्त माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश महाजन, उर्जीता शिसोदे व भावना सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे आर्थिक साक्षरतेविषयी स्पष्टता व आत्मविश्वास वाढल्याचे सहभागी महिलांनी सांगितले.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 128200
22 Ct सोने 91.60% : ₹. 118000
18 Ct सोने 75.00% : ₹. 97500
शुद्ध चांदी 999%:₹. 1850/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
