नाभिक समाजात संतापाची लाट; ९ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधमाला फाशीची मागणी..

0
New-Doc-12-12-2025-09.23.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुका नाभिक संघटनेतर्फे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खामत्ताने गावात ९ वर्षीय नाभिक समाजातील बालिकेवर ७० वर्षीय नराधमाने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून समाजाच्या भावना अत्यंत दुखावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अत्याचार आरोपीला अटक झाली असली तरी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चालू अधिवेशनात विषय मांडावा, तसेच हा खटला Fast Track कोर्टात जलदगतीने चालवून दोषीला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे.

हे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळ म.जा. अंतर्गत अमळनेर तालुका नाभिक कार्यकारी मंडळातील पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरीसह सादर केले.
स्वाक्षरी करणारे पदाधिकारी :
श्री. मधुकर तुळशिराम सैंदाणे – तालुकाध्यक्ष
श्री. दिलीप राजाराम सोनवणे – तालुका उपाध्यक्ष
श्री. सिताराम महादु बोरसे – तालुका सचिव
श्री. भिकन दंगल सैंदाणे – तालुका खजिनदार
श्री. जगदिश गोविंदराव ठाकरे – तालुका संपर्क प्रमुख
श्री. नंदलाल नामदेवराव जगताप – तालुका संघटक
श्री. सुरेश रमेश वारूळे – जिल्हासदस्य
श्री. गणेश दगडू सैंदाणे – जिल्हासदस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed